न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २७ मे २०२३) :- गहाळ झालेल्या तब्बल ३० मोबाईलचा एमआयडीसी भोसरी पोलीसांनी तांत्रिक विश्लेषणाद्वारे शोध घेवून सॅमसंग, ओपे, विवो, वनप्लस, रेडमी रिअलमी असे एकुण ३,८५,००० रुपये किंमतीचे मोबाईल हस्तगत केले. तसेच सोन्याचे दागिने हस्तगत करून मुळ मालकांना परत केले आहेत.
मासीक भेटी दरम्यान गहाळ झालेल्या एकुण ३० मोबाईलचे व सोन्याचे दागिने तक्रारदार यांना एम.आय.डी.सी भोसरी पोलीस स्टेशन येथे समक्ष बोलावुन परिमंडळ – १ चे पोलीस उप आयुक्त विवेक पाटील यांच्या हस्ते गहाळ मोबाईल तसेच एमआयडीसी भोसरी पोलीस स्टेशनकडील चोरीच्या दोन गुन्हयातील २० ग्रॅम वजनाचे १,००,००० रुपये किमतीचे सोन्याचे दागिने फिर्यादींना परत देण्यात आले आहेत.
ही कामगिरी विनयकुमार चौबे पोलीस आयुक्त पिंपरी चिंचवड, संजय शिंदे सह पोलीस आयुक्त, विवेक पाटील पोलीस उपायुक्त, परिमंडळ-१, प्रेरणा कट्टे सहा. पोलीस आयुक्त, पिंपरी विभाग, राजेंद्र निकाळजे वरिष्ठ पोलीस निरीक्षक एम. आय. डी. सी भोसरी पोलीस स्टेशन यांच्या सुचना व मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार अनिल जोशी यांनी मोबाईलचे तांत्रिक विश्लेषण करून सचिन चव्हाण, पोलीस उप निरीक्षक पोलीस अंमलदार चंद्रकांत गवारी, स्वप्नील शेलार, संजय जरे, गणेश बो-हाडे, राहुल लोखंडे, शरद गांधिले, भागवत शेप, नितीन खेसे, विशाल काळे, अनिकेत कांबळे, उषा होले एम.आय.डी.सी भोसरी पोलीस स्टेशन यांनी सदर उल्लेखनिय कामगीरी केली आहे.