न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २८ मे २०२३) :- स्वतःच्या आर्थिक फायदयाकरिता आरोपीने बनावट कागदपत्रे तयार केली. त्याचा खरा म्हणुन वापर करुन त्याद्वारे बनावट सिम कार्ड घेतले. त्याचा वापर भारत सरकारने बंदी घातलेल्या क्रिकेट बेटींगचा व्यवसाय करण्याकरिता केला.
त्यासाठी गुगल क्रोमध्ये जावुन DIMOND EXCHANGE ADMIN ही वेबसाईड टाकुन आयडी BOOKSHAYAM पासवर्ड JHEEL@२ १२१ याचा वापर केला. चालू क्रिकेट मॅचवर ब्रेटींग / सट्टा घेवुन तसेच ग्राहकांनी मागणी केलेल्या रक्कमेच्या मोबदल्यात तेवढ्या रक्कमेच्या कींमतीएवढ्या रक्कमेची मर्यादा असलेला आयडी व पासवर्ड बनवुन तो विकुन सरकारने बंदी घातलेल्या क्रिकेट बेटींग/सट्टावर अवैध मार्गाने काळया पैशांची आर्थिक उलाढाल करून शासनाची फसवणुक केली आहे, असे फिर्यादीत म्हटले आहे.
हा प्रकार (दि. २६) रोजी रात्री ९.४० च्या सुमारास लोढा बेलमोंडे सोसायटी, मुबई-पुणे एक्सप्रेस रोड लगत एम.सी.ए. क्रीकेट स्टेडीयम समोर घडला. दरोडा विरोधी पथकाने दुर्गेश बजरंगलाल पारीख (वय ३५ वर्षे, मुळगाव राज्यस्थान), शिवदान शक्ती सिंग (वय ३१ वर्षे, रा. लोढा बेलमोंडे सोसायटी, मूळ राजस्थान), साँवरीया गिरधारीलाल प्रजापत (वय २१ वर्षे, मुळगाव रा. सदर), ओमप्रकाश धनाराम चौधरी यांच्या विरोधात शिरगाव पोलीस ठाण्यात १४८/२०२३ भादवि ४२०, ४६५, ४६८, ४७१, ३४ महाराष्ट्र जुगार कायदा कलम ४ (अ) व भारतीय टेलीग्राफ अॅक्ट कलम २५ (क) नुसार गुन्हा दाखल करीत त्यांना अटक केली आहे.















