न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २८ मे २०२३) :- आयपीएल २०२३ च्या फायनलच्या सामन्यात पावसाने खोडा घातला आहे. चेन्नई सुपर किंग्ज आणि गुजरात टायटन्स यांच्यात हा सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये ७.३० वाजता सुरु होणार होता. मात्र, मैदानात पावसाच्या सरी कोसळल्याने सामन्यात व्यत्यय आलं आहे.
जर हा सामना ९.३५ वाजता सुरु झाला, तर हा सामना पूर्ण २० षटकांचा खेळवला जाईल. दोन्ही संघाना २० षटके मिळतील. पण १२.०६ वाजेपर्यंत पाच षटकांचा सामना झाला नाही, तर उद्या सोमवारी राखीव दिवशी २९ मे ला पुन्हा हा फायनलचा सामना खेळवण्यात येईल.
सोमवारीही हा सामना झाला नाही, तर गुणतालिकेत अव्वल स्थानावर असलेल्या गुजरात टायटन्सला यंदाच्या आयपीएल हंगामाचं जेतेपद देण्यात येईल.


















