न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०५ जून २०२३) :- पिंपरी-चिंचवड व मावळ तालुक्यासह अनेक भागांची तहान भागवणाऱ्या पवना धरणात २३.६२ टक्के इतका पाणीसाठा शिल्लक आहे. पावसाने जरी ओढ दिली तरी जुलै अखेरपर्यंत पाणी पुरेल, अशी माहिती पवना धरणाचे शाखा अभियंता समीर मोरे यांनी दिली.
पवना धरणाची पाणी पातळी ६०२.२२ मीटर असून, धरणामध्ये एकूण साठा ८८.०६ मीटर एवढा आहे. तर उपयुक्त पाणीसाठा ५६.९१ फूट इतका आहे. हा पाणीसाठा जुलै अखेरपर्यंत पुरेल. मात्र, पावसाने ओढ दिल्यास पाणीटंचाई जाणवू शकते, अशी माहिती पवना धरण पाटबंधारे विभागाने दिली आहे.












