न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०५ जून २०२३) :- सुदुंबरे-सुदवडीचे ग्रामदैवत रोकडोबा महाराज यात्रेनिमित्त झालेल्या बैलगाडा शर्यतीत लक्ष्मण जाधव यांच्या गाड्याने प्रथम क्रमांक पटकाविला. तर, ११.३८ सेकंदात घाट सर केलेल्या महादू पापळ यांचा गाडा घाटाचा राजा ठरला आहे.
https://youtube.com/shorts/FHCX5pXAS9U?feature=share
रोकडोबा महाराज बैलगाडा संघटना आणि रोकडोबा महाराज उत्सव समितीच्या वतीने झालेल्या या बैलगाडा शर्यतीत पुणे जिल्ह्याच्या विविध तालुक्यातील २०० बैलगाडे सहभागी झाले होते. सुरुवातीस उद्घाटन आणि सायंकाळी बक्षिस वितरण प्रमुख ग्रामस्थांच्या हस्ते करण्यात आले.
संयोजन मोहन काळडोके, जालिंदर गाडे, राजेंद्र गाडे, सुरेश गाडे, प्रवीण गाडे, ताराचंद गाडे, संतोष काळे, भीमराव काळे, पप्पू कडुसकर, प्रतीक गाडे, पप्पू जंबुकर यांनी केले. कुठलाही अनुचित प्रकार न घडता शर्यती शांततेत पार पडल्याची माहिती तळेगाव एमआयडीसी पोलिस ठाण्याचे हवालदार प्रशांत सोरटे यांनी दिली.












