न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी ( दि. ०७ जून २०२३) :- ‘सरकारी कामाचे टेंडर मिळवून देतो व त्याव्दारे चांगला परतावा देतो’ असे आरोपीने फिर्यादीला आमिष दाखवले. त्यासाठी आरोपीने फिर्यादीकडून २३,१०,००० रुपये ऑनलाईन व रोख स्वरुपात रक्कम घेतली. तसेच भिशीमध्ये चांगला परतावा देतो म्हणत २,४०,००० रोख रक्कम घेतली.
आरोपीने फिर्यादीकडून एकुण २५,५०,००० रुपये रक्कम घेतली. त्या मोबदल्यात सरकारी कामाचे टेंडर न देता व फिर्यादीचे पैसे परत न करता फिर्यादीची आर्थिक फसवणूक केली आहे, असे फिर्यादीत म्हटले आहे.
ही घटना (दि. १०/१२/२०१८ ते दि.१०.०२.२०२०) दरम्यान रोजवुड हॉटेल, थेरगांव आणि एफ ५०१, स्विस कॉऊंटी, थेरगांव येथे घडली. महिला फिर्यादीने आरोपी परमेश्वर ऊर्फ प्रमोद नागनाथ सुर्यवंशी, महिला आरोपी, महिला आरोपी यांच्या विरोधात फिर्याद दिली आहे. वाकड पोलिसांनी ५४१/२०२३ भादवी कलम ४०६,४२०,३४ नुसार गुन्हा दाखल केला आहे.












