न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी ( दि. ०७ जून २०२३) :- लहान मुलाच्या भांडणाच्या कारणावरुन फिर्यादीच्या शेजारी राहणारा आरोपी फिर्यादी घरी नसताना त्यांच्या घरात घुसला. फिर्यादीची पत्नी व आईला शिवीगाळ करीत हाताने मारहाण करुन घराचा दरवाजा तोडुन नुकसान केले. घरातील एखाद्याला तरी मी संपवुन टाकीन, अशी धमकी दिली. त्यानंतर दुसऱ्या दिवशी फिर्यादी हे त्यांची रिक्षा घेऊन धंद्यासाठी ताथवडे याठिकाणी थांबले होते.
आरोपी हा त्या ठिकाणी आला. ‘बरे झाले तु येथे सापडलास, काल तु सापडला नाहीस, नाहीतर तुझा मर्डरच करून टाकला असता’ असे म्हणत धमकी देवून ‘मी इथला भाई आहे, असे म्हणुन आरोपीने कंबरेला असणारा कोयता काढला व कोयता हातात दाखवत फिर्यादीच्या आजुबाजुला फिरु लागला. त्याने वर काढलेला कोयता पाहून आजुबाजुच्या लोकांमध्ये दहशत पसरली. लोक आजुबाजुला पळु लागते. त्याने कोयता दाखवत ‘आता तुला संपवतोच’ असे ओरडत फिर्यादीच्या डोक्यावर वार केला. परंतु तो वार फिर्यादीने चुकवला व त्याच्या तावडीतून सुटुन पळून गेले, असे फिर्यादीत म्हटले आहे.
हा प्रकार (दि. ५ आणि ६) रोजी सायंकाळी ६.३० वाजता काळाखडक, वाकड व दुपारी २.३० वाजता म्हातोबा रिक्षा स्टैंड, हेवेथ लॉन मॉल, ताथवडे येथे घडला. फिर्यादी गणेश श्रीरंग वाघमारे (रिक्षा ड्रायव्हर) यांनी आरोपी संदिप ऊर्फ बाळु शांताराम भोसले याच्या विरोधात फिर्याद दिली आहे.
वाकड पोलिसांनी ५४३/२०२३ भा.दं.वि. कलम ३०८, ४५२, ४२७,५०४, ५०६ सह आर्म अॅक्ट कलम ४/२५ सह क्रिमीनल लॉ अॅमेंडमेंड अॅक्ट कलम ३ व ७ प्रमाणे गुन्हा दाखल करीत आरोपीला अटक केली आहे.












