न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०८ जून २०२३) :- खोटी ओळख दाखवुन आरोपीने फिर्यादीला ‘मी पी एम ओ कार्यालयात सचिव पदावर कार्यरत असुन, माझी प्रशासनातील उच्चस्थ पदावरील व्यक्तीची ओळख आहे, असे खोटे सांगितले.
तसेच नवीन सैनिकी शाळेचा प्रस्ताव मंजुर करून देतो, असे आमिष दाखवत फिर्यादीकडुन वेळोवेळी ४२,००,००० रूपये स्वीकारले. ठरल्याप्रमाणे काहीही न करता फिर्यादीच्या पैशांचा अपहार करुन फिर्यादीची आर्थिक फसवणुक करून नुकसान केले, असे फिर्यादीत म्हटले आहे.
हा प्रकार (दि. १/०५/२०२२ ते दि. २३/०७/२०२२) दरम्यान तळेगाव दाभाडे येथे घडला. फिर्यादी मनिष उर्फ मेघेद हेमकृष्ण कापगते (साकोली, जि. भंडारा) यांनी आरोपी विनय देव उर्फे वासुदेव निवृत्ती तायडे, महिला आरोपी यांच्या विरोधात फिर्याद दिली आहे. तळेगाव दाभाडे पोलिसांनी २६१/२०२३ भा.द.वि. कलम ४१९, ४२०,१७०, ४०६, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.