न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०८ जून २०२३) :- बालविवाह करण्याच्या उददेशाने आरोपींनी संगनमताने आधारकार्ड, पॅनकार्ड, खोटे मुद्रांक, खोटा निकाहनामा, बनावट सहया करुन बनावट कागदपत्रे तयार केले. आरोपीचा फिर्यादीच्या मुलीबरोबर बालविवाह लावुन फसवणुक केली, असे फिर्यादीत म्हटले आहे.
हा प्रकार (दि. २०/०९/२०२०) रोजी वेताळनगर, चिंचवड येथे घडला. फिर्यादी गणेश भल्लाजी परिहार यांनी आरोपी मेहबुब लियाकत अली शेख, अमिर पाशा शेख, पाशा शेख, जिशान पाशा शेख, इम्रान पाशा शेख यांच्या विरोधात फिर्याद दिली आहे. चिंचवड पोलिसांनी २५७ / २०२३ भा.दं.वि. कलम ४२०, ४६४, ४६८, ४७१, ३४ नुसार गुन्हा दाखल केला आहे.