न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०८ जून २०२३) :- प्रस्थानावेळी मुख्य मंदिरात गर्दी आणि चेंगराचेंगरी टाळण्यासाठी दिंडीतील ७५ वारकऱ्यांनाच आत घेण्याचं आळंदी देवस्थानने ठरवलं आहे. तशी विनंती दिंडी मालकांना, फडकऱ्यांना आळंदी देवस्थानचे विश्वस्त योगेश देसाई यांनी केली आहे.
माऊलींच्या पालखीच दुपारी चारच्या सुमारास प्रस्थान आहे. ते वेळेत व्हावं आणि शांततेत पार पडावं यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचं त्यांनी म्हटल आहे. गेल्यावर्षी प्रस्तावनावेळी मंदिरात १७ हजार वारकरी दाखल झाले होते. त्यामुळे मोठी गर्दी झाली होती, असे देखील त्यांनी म्हटले आहे. आषाढी वारी निमित्त लाखो वारकरी आळंदीत दाखल होत आहेत. दोन दिवसांवरती माऊलींचा पालखी सोहळा येऊन ठेपला आहे. यावर्षी दिंडीतील वारकऱ्यांवर मर्यादा घालण्यात आली आहे.
माऊलींच्या पालखीचे पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान होताच नगर प्रदीक्षासाठी उर्वरित वारकरी आपापल्या दिंडीमध्ये सहभागी होऊन मंदिरात येऊ शकतात, अस विश्वस्त योगेश देसाई यांनी सांगितले आहे.












