न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २६ जून २०२३) :- साक्षर सक्षम सहकार अभियान यशस्वीपणे राबवणारे Sapact Pvt, Ltd ने ” सत्तांतर की स्थित्यंतर ” या विषयावरील संचालक प्रशिक्षण शिबिर लोणावळा येथे आयोजित केले होते.
यावेळी महाराष्ट्रातील पतसंस्थांचे संचालक मोठ्या संख्येने हजर होते. पतसंस्थांची स्थिती, प्रगती, शिस्त आणि जबाबदारी अशा गोष्टी सकारात्मक कृतीने पार पाडण्याचे तंत्र उत्साही वातावरणात सर्वांना लाभले.
यावेळी साक्षर सक्षम सहकार अभियान यशस्वीपणे पूर्ण केल्याबद्दल संस्थेचे संस्थापक संचालक विनोद अष्टुळ यांना sapact चे कार्यकारी अधिकारी संदीप पाटील यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले. याप्रसंगी भागीरथी पतसंस्थेचे चेअरमन प्रदीप गोगावले, शिवाजी डोंबे, गोरख शिंदे आणि संदीप डोंबाळे आदी संचालक उपस्थित होते.














