न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २६ जून २०२३) :- पिंपळे सौदागर परिसरात विविध ठिकाणी प्रलंबित कामांची नगरसेवक शत्रुघ्न काटे यांनी आज सोमवारी पाहणी केली. त्याबाबत आढावा घेतला. स्वराज चौक येथील “श्री १००८ शांतिनाथ दिगंबर जैन मंदिर” या मंदिराकडे जाणारा रस्ता रहदारीसाठी अडचणीचा ठरत आहे. त्यामुळे तात्पुरत्या स्वरूपात ग्राऊटींग आणि रोलिंग करून देण्याबाबतच्या सूचना काटे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना केल्या आहेत.
कॅस्टेलिया सोसायटी ते स्वराज चौक दरम्यान रस्त्यावर पावसामुळे खूप पाणी साचत आहे. तसेच कोकणे चौक येथील थोपटे लॉन्सकडे जाणारा १२ मी. रस्ता (द्वारका सन क्रिस्ट फेज १, २ आणि ३ या सोसायटी समोरील रस्ता) काँक्रीटीकरण काम रखडले आहे, ही कामे लवकर मार्गी लावावीत, अशी सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना केली.
यावेळी स्थापत्य विभागाचे कार्यकारी अभियंता विलास देसले, उपअभियंता सुनिल नरोटे, कनिष्ठ अभियंता प्राजक्ता गव्हाणे, ड्रेनेज विभाग कनिष्ठ अभियंता भाग्यश्री ढोले आणि इतर पालिका अधिकारी व ठेकेदार उपस्थित होते.
















