न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३० मार्च) :- शिवसेना पक्षाचे उपनेते व सोलापूर धाराशीवचे संपर्कप्रमुख विधानपरिषद सदस्य आमदार डाॅ. प्राध्यापक तानाजी सावंत यांना कुणी तरी जीवे मारण्याची धमकी दिली आहे. या धमकीचा शिवशाही व्यापारीसंघ महाराष्ट्र राज्याच्या वतीने पत्रक काढून जाहीर निषेध व्यक्त केला आहे.
या पत्रात म्हटले आहे की, जो कोणी हरामखोर असेल, त्याने सरळ सरळ मैदानात यावे आणि आपली मर्दानगी दाखवावी, असे निनावी पत्र पाठवून धमकी देऊ नये. लोकसभा निवडणुकीत तानाजी सावंत हे धाराशीव (उस्मानाबाद) व सोलापूर जिल्हा सांभाळत आहेत. या जिल्ह्य़ातील हजारो शिवसैनिकांच्या सोबत शिवशाही व्यापारीसंघाचे पदाधिकारी शिवसेना उपनेते तानाजी सावंत यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे आहेत. हे विसरु नये. सरांच्या अंगाला नुसता हात जरी लावला तरी तो हात कलम केला जाईल.
तानाजी सावंत यांना धमकी देणाऱ्यांना उत्तर देण्यासाठी शिवसैनिक कटिबद्द आहे. सर लोकसभा निवडणुकीत दमदारपणे शिवसेनेचा प्रचार करणार व त्यांनी जबाबदारी घेतलेले उमेदवार प्रचंड बहुमताने विजयी करणारच हे लक्षात ठेवा. असल्या फालतू व फुसक्या धमक्यांना शिवसेना व शिवसैनिक घाबरत नाहीत, हे महत्वाचे. तुम्ही धमक्या दिल्या म्हणून शिवसेना उपनेते तानाजी सावंत प्रचारात सहभागी होणार नाहीत हा गोड गैरसमज डोक्यातुन काढुन टाका.
तुम्ही धमकी देणारे कुणाचेही बगलबच्चे असाल काहीही फरक पडत नाही. आला अंगावर तर घेतला शिंगावर या न्यायाने आम्ही शिवसैनिक वागणार आणि डायरेक्ट फाडणारच.. परिणामांची चिंता आम्हाला नाही… सावधान… फालतु धाडस कराल आणि जीव गमावुन बसाल.. असे या पत्रात शिवशाही व्यापारीसंघाचे प्रदेश अध्यक्ष युवराज दाखले यांनी म्हटले आहे.










