- अंडा भुर्जी आणि पाव दिला नाही म्हणून व्यवसायिकाला रॉडने मारहाण…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १५ जुलै २०२३) :- दुकानात येवुन दोन अंडा बुर्जी आणि पाव दिले नाहीत म्हणुन दोघांनी फिर्यादीला लोखंडी रॉडने मारहाण केली. डोक्यात, हातावर, पाठीत मार लागून फिर्यादीला जखमी झाले. तसेच फिर्यादीच्या महिला कामगाराला हाताने आणि पोटात लाथा मारुन त्यांना जखमी केले शिवाय त्यांच्या पतीला लोखंडी तवा व लाकडी बॅटने हातावर पाठीत पायावर मारुन जखमी केले. तसेच आरोपीने त्याच्या खिश्यातील ८००० रुपये जबरदस्तीने काढुन घेतले.
‘येथे धंदा करायचा असेल तर आम्हाला पाहिजे ते लगेच दयावेच लागेल’ असे म्हणुन दुकानातील साहित्याची व मालाची नासधुस करुन मोडतोड केली. लोखंडी रॉड फिरवत “तुला महित नाही का मी भोसरीचा भाई आहे. आम्हाला जे पाहिजे असते ते लगेच दयावेच लागेल नाही तर मारुन टाकीन” अशी धमकी दिली. त्यांच्या दहशतीला घाबरुन लोक सैरावैरा पळु लागले, असे फिर्यादीत म्हटले आहे.
ही घटना (दि. १३) रोजी रात्री ७.३० च्या सुमारास गोरे हॉस्पीटलच्या बाजुला, चौफुला चौक, सखुबाई गवळी गार्डन पाठीमागे, भोसरी येथे अंडा भुर्जीच्या दुकानात घडली. फिर्यादी मेघराज बैजनाथ मंटाळे यांनी आरोपी पिल्या उर्फ सुदर्शन राक्षे, करण गुरूनाथ राठोड, पत्या ऊर्फ प्रथमेश दिलीप कांबळे, करण राठोड याचा मित्र यांच्या विरोधात फिर्याद दिली आहे. भोसरी पोलिसांनी ५८० / २०२३ भा.दं.वि. कलम ३९७, ५०६ आर्म अॅक्ट ४ (२५) मपो का ३७ (१) सह १३५, क्रि. लॉ अमेंडमेंट ३,७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.