- चिंचवडगावात शिवसेनेच्या ‘भव्य रोजगार महोत्सव २०२३’ मेळाव्यास तरुणांचा उस्फुर्त प्रतिसाद…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १६ जुलै २०२३) :- आपल्या देशात मनुष्यबळाची कमतरता नसून कुशल मनुष्यबळाची मोठ्या प्रमाणात दिवसेंदिवस औद्योगिक क्षेत्राला उणीव भासत आहे. त्यामुळे तरुणांनी व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या माध्यमातून रोजगार कसा मिळविता येईल यावर लक्ष केंद्रीत करावे. तसेच एखाद्या औद्योगिक कंपनीत कुठल्याही पदावर काम करत असताना त्या कंपनीसाठी लागणाऱ्या सर्व गोष्टींचे ज्ञान आत्मसात करुन भविष्यात मोठा उद्योगपती होण्याच्या दिशेने वाटचाल करावी, असे आवाहन माजी मंत्री तथा पुणे जिल्हा संपर्कप्रमुख सचिन अहिर यांनी केले.

माजी मुख्यमंत्री तथा शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेना चिंचवड विधानसभेचे शहर संघटक संतोष सौंदणकर, शिवसेना विभाग प्रमुख संदिप भालके आणि जिजाऊ सोशल फाऊंडेशनच्या अध्यक्षा ज्योती भालके यांच्या वतीने आज रविवारी (दि. १६) रोजी चिंचवडगावातील चिंचवडे लॉन्समध्ये ‘भव्य रोजगार महोत्सव २०२३’ या रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी कार्यक्रमास माजी मंत्री तथा पुणे जिल्हा संपर्कप्रमुख सचिन अहिर, महिला संपर्कप्रमुख लताताई पाष्टे, जिल्हा संघटिका सुलभाताई उबाळे, शैलाताई खंडागळे, अशोक खांडेभरड, शहर प्रमुख अॅड. सचिन भोसले, पुणे शहर प्रमुख गजानन थरकुडे, शहर संघटिका अनिता तुतारे, चिंचवड विधानसभा प्रमुख अनंत कोऱ्हाळे आणि माजी नगरसेवक संजय दुर्गुळे, श्रीमंत गिरी,हरेश नखाते, संतोष पवार, नितीन दर्शले, सुधाकर नलावडे, विजय साने, दिलीप भोंडवे, किरण दळवी, नितीन बोंडे, ज्ञानेश्वर शिंदे, बाबासाहेब भोंडवे, कुदरत खान, सुनील पाटील, गोरख पाटील, अमित सुरवसे, गोरख नवघणे, महेश कलाल, मल्हार देशमुख, काळे काका, महेश शेतीसंधी, किशोर सातपुते, वैभवी घोडके, सरिता आल्हाट, रजनी वाघ, उषा आल्हाट, दमयंती गायकवाड, वैशाली काटकर, योगिनी वाल्हेकर, तसलीम शेख, गीता कुसाळकर, आणि टेक करिअर सोल्युशनचा स्टाफ, शिवसेनेचे सर्व आजी-माजी पदाधिकारी, महिला आघाडी, सर्व पदाधिकारी, शिवसेनेचे सर्व अंगिकृत संघटनेचे पदाधिकारी, युवासेना अधिकारी आदि उपस्थित होते.
सुलभाताई उबाळे म्हणाल्या, युवकांना रोजगाराची संधी देण्यासाठी हा रोजगार मेळावा निश्चितच उपयुक्त ठरणार आहे. आज नोकरी मिळवायची असेल तर पदवीसोबतच कौशल्य व गुणवत्ता महत्वाची आहे. युवकांनी कौशल्य व गुणवत्तेवर भर देण्याची गरज आहे. कोणताही व्यवसाय करताना त्यासाठीचे नियोजन व कष्ट अत्यंत महत्वाचे आहे. कोणत्याही उद्योग व्यवसायात कष्ट केले की निश्चित यश मिळतेच.
या मेळाव्यात राष्ट्रीय आणि बहुरराष्ट्रीय कंपन्यांचा सहभाग होता. पाचशेपेक्षा उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या. त्यापैकी ५२४ उमेदवारांची निवड झाली. त्यापैकी दोनशे उमेदवारांना मान्यवरांच्या हस्ते नियुक्ती प्रमाणपत्र देण्यात आले. तसेच रक्तदान शिबिराचे देखील आयिजन करण्यात आले होते.
प्रास्तविक जिजाऊ सोशल फाऊंडेशनच्या अध्यक्षा ज्योती भालके यांनी केले. शिवसेना विभाग प्रमुख संदिप भालके यांनी सूत्रसंचालन तर किरण दळवी यांनी आभार मानले.














