न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १६ जुलै २०२३) :- दोघींनी संगणमत करून स्वतःच्या अर्थिक फायद्यासाठी पिडीत महिलांना पैशांचे अमिष दाखवले. त्यांच्याकडून वेश्या व्यवसाय करवुन घेऊन त्यातून मिळालेल्या रकमेतून स्वतःची उपजिवीका भागविली.
याप्रकरणी अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंधक कक्षाने (दि. १४) रोजी दुपारी ४.०० च्या सुमारास भिगवन चिलापी हॉटेल जवळ, च-होली फाटा, दिघी येथे कारवाई केली.
दिघी पोलिसांनी ३०५/२०२३ भा.दं.वि. कलम ३७०, (३), ३४ सह अनैतिक व्यापारास प्रतिबंध अधिनियम १९५६ चे कलम ३,४,५ प्रमाणे दोन महिला आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.














