न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १६ जुलै २०२३) :-लोणावळ्यातील भुशी धरणावर विकेंड असल्याने पर्यटकांची तुफान गर्दी झाल्याचं बघायला मिळालं. आखाड पार्टीच नियोजन आणि विकेंड असल्याने लोणावळ्यात हजारो पर्यटक दाखल झाले होते. सहारा ब्रिज, टायगर पॉईंट, लायन्स पॉईंट या ठिकाणी पर्यटकांनी प्रचंड गर्दी केली होती. लोणावळ्यासह भुशी धरण आणि टायगर पॉईंट कडे जाणाऱ्या रस्त्यांवर वाहनांच्या रांगा बघायला मिळाल्या.
लोणावळ्यासह भुशी धरण टायगर आणि लायन्स पॉईंट कडे जाणाऱ्या रस्त्यांवर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. यामुळे मोठी वाहतूक कोंडी झाली. सायंकाळच्या सुमारास सर्व पर्यटक लोणावळ्याच्या दिशेने निघाल्यानंतर वाहतूक कोंडीचे आणखी चित्र विदारक होते.
पोलिसांनी अनेक ठिकाणी वाहतूक सुरळीत केली असली तरी प्रत्येक ठिकाणी पोलीस पोहोचणं अशक्य गोष्ट आहे. पर्यटकांचा वीकेंड आणि आखाड पार्टीचे नियोजन यामुळे लोणावळा पोलिसांची दमछाक झाली.