न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३० मार्च) :- पुणे शहर, पिंपरी-चिंचवड आणि उर्वरित जिल्ह्य़ात मिळून एकूण मतदारांची संख्या ७५ लाखांपर्यंत जाण्याची शक्यता आहे. या मतदार यादीमध्ये दुबार नावे असलेल्या मतदारांचा गोषवारा तयार करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. त्या मतदारांची नावे चिन्हांकित केली जाणार आहेत. त्यामुळे संबंधित मतदार हे मतदानासाठी मतदान केंद्रांवर गेल्यावर त्यांची कसून चौकशी होणार आहे.
निवडणुकीच्या तयारीबाबत आयोजित पत्रकार परिषदेत जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी ही माहिती दिली. उपजिल्हा मुख्य निवडणूक अधिकारी मोनिका सिंह या वेळी उपस्थित होत्या.
राम म्हणाले, पुणे, बारामती, मावळ आणि शिरूर अशा चार लोकसभा मतदारसंघांत मिळून एकूण एक लाख एक हजार ८२८ दुबार मतदार आहेत. त्यामध्ये छायाचित्र दुबार असणाऱ्यांची संख्या ७५ हजार २२० आहे. दुबार नावे असणारे २६ हजार ५८० मतदार असून, दुबार मतदारांची संख्या प्रमाणित करण्यात आली आहे. तर, मृत व्यक्तींची नावे वगळण्यात आली आहेत. नियमानुसार आचारसंहिता काळात कोणाचेही नाव दुबार असले, तरी ते मतदार यादीतून वगळले जात नाही. त्यामुळे दुबार मतदारांची यादी तयार केली असून ही नावे चिन्हांकित केली आहेत.
लोकसभा मतदारसंघनिहाय दुबार मतदार :
मावळ लोकसभा मतदारसंघातील चिंचवड सात हजार १७४, पिंपरी पाच हजार ४३७ आणि मावळ पाच हजार ९५१. शिरूर लोकसभा मतदारसंघातील जुन्नर दोन हजार १३९, आंबेगाव एक हजार ६९८, खेड – आळंदी चार हजार १४८, भोसरी नऊ हजार ५०९, शिरूर पाच हजार ६६,










