न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३० मार्च) :- मावळचे विद्यमान खासदार व मावळ लोकसभेचे महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांच्यापुढील अडचणी काही केल्या संपत नाहीत. तिकडे राष्ट्रवादीचे उमेदवार पार्थ पवार यांच्यासाठी पक्षाध्यक्ष शरद पवारांपासून ते त्यांच्या आत्यापर्यंत सर्वच जोमाने प्रचाराला लागले आहेत.
खासदार बारणे यांचे कट्टर विरोधक आमदार लक्ष्मण जगताप यांची बारणे यांनी काही दिवसांपूर्वी भेट घेत, प्रचारात सक्रीय होण्यासाठी गळ घातली होती. परंतु, युती होऊनसुद्धा आजतागायत लक्ष्मण जगताप व शहर भाजपचा कंपू खासदार बारणे यांच्या प्रचारात सक्रीय झालेला नाही.
त्या पार्श्वभूमीवर आज शनिवारी शिवसेना नेते व खासदार संजय राउत यांनी आमदार लक्ष्मण जगताप यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. तब्बल तासभर चाललेल्या या भेटीत काय घडले? याबाबत अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. संजय राउत आमदार जगताप यांची यशस्वी मनधरणी का याबाबत खलबत सुरु आहेत.










