- कोर्टाने फर्माविली कारावासाची शिक्षा; सांगवी पोलीसांच्या कारवाईला यश…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १९ जुलै २०२३) :- सांगवी पोलीसांच्या उत्कृष्ठ तपासामुळे पाच आरोपींना न्यायालयाने शिक्षा दिली आहे. सांगवी पोलीस स्टेशनमध्ये १९९/२०१५, भा.द.वि. कलम ३०४(अ). ३४. अन्वये गुन्हा दाखल होता. (दि. २९/११/२०१० ते ३०/११/२०१०) दरम्यान सामान्य रुग्णालय औंध कैंप, पुणे येथे फिर्यादी भगवान दौलत वाकोडे यांची विवाहित मुलगी ही बाळंतपणासाठी अॅडमिट होती.
तिच्यावर उपचार करणारे व तपासणी करणारे स्त्री रोग तज्ञ आरोपी २ डॉक्टर यांनी महिलेच्या पोटात वेदना होत असताना फिर्यादी यांनी त्यांना समक्ष आरोपी डॉक्टरांना सांगीतले असताना फिर्यादी समक्ष असताना तिची तपासणी करण्यास निष्काळजीपणा हयगयी केली. तसेच तीन अधिपरिचारिका यांना फिर्यादीच्या मुलीस पोटात होणाऱ्या त्रासाबाबत वारंवार सांगितले. त्यांनी डॉक्टरांना कळवण्यास हयगय व निष्काळजीपणा केला. यातील ५ आरोपींच्या निष्काळजीपणा आणि हईगईमुळे फिर्यादी यांच्या मुलीचे बाळ जन्मता: मयत झाले. याप्रकरणी दोन डॉक्टर व अधिपरिचारीका असे एकुण ५ आरोपीताविरुध्द भा.द.वि. कलम ३०४ (अ). ३४ प्रमाणे गुन्हा दाखल केला होता.
हा गुन्हा सहा. पो. उप निरीक्षक एल. एस. पोमण यांनी दाखल करून पुढील तपास सहा पोलीस निरीक्षक पी.डी. भुजबळ करीत होते. या गुन्ह्याचा तपास अतिशय उत्कृष्टरित्या करून महत्वाची व परीस्थीजन्य पुरावे कायदेशीररित्या गोळा करून पाच आरोपी निश्चित करून वरिष्ठांकडुन तपासणी करुन घेवुन प्रथम वर्ग दंडाधिकारी, पिपरी न्यायालय येथे सादर केले होते.
सांगवी पोलीसांचा उष्कृष्ट कामाचा परीपाक म्हणुण (दि. १८) रोजी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एन. आर. गजभिये, पिंपरी न्यायालय यांनी २ डॉक्टर आरोपी व तीन अधिपरीचारिका आरोपी यांना भादवी कलम ३०४(अ).३४ प्रमाणे दोषी ठरवून २ वर्ष साधा कारावास व प्रत्येकी ५० हजार रुपये दंड व एक लाख रुपये फिर्यादीची मुलगी हिला नुकसान भरपाई देणे, अशी शिक्षा ठोठावली आहे.
या केस दरम्यान श्रीराम पौळ वरीष्ठ पोलीस निरीक्षक, सुनिल तांबे, पोलीस निरीक्षक गुन्हे यांनी कोर्ट अमलदार प्रदिप साबळे, राणी काळे, पोलीस अमलदार यांना वेळोवेळी मार्गदर्शन केले आहे.












