न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३१ मार्च) :- चिंचवडगाव येथील आहेर गार्डनमध्ये शिवक्रांती मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, माजी आमदार कृष्णराव भेगडे, माजी महापौर मंगला कदम, अरुण बोऱ्हाडे आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना अजित पवार म्हणाले की, युती शासनाच्या चुकीच्या धोरणांमुळे शहरातील अनेक कारखाने बंद पडले आहेत. काही चालणारे कारखाने आहेत, पण त्यांच्या कामाची पाळी कमी केली आहे.
त्यामुळे कामगार वर्गात अस्वस्थतेचे वातावरण आहे. दरवर्षी दोन कोटी नोकऱ्या देऊ, या आश्वासनांची पूर्तता केलेली नाही. कायदा व सुव्यवस्थेचा बोजवारा उडालेला आहे. शेतक-यांच्या मालाला योग्य भाव नाही. त्यामुळे शेतकरी आत्महत्येचे प्रमाण वाढलेले आहे. त्यामुळे नागरिकांनी सजग डोळ्यांनी मतदान करून, युतीला त्यांची जागा दाखवून द्यावी.










