न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १ एप्रिल) :- शिवसेना-भाजप व मित्र पक्षांची महायुती झालेली आहे. जागा वाटपानुसार ठिकठीकाणी मित्र पक्षांच्या उमेदवारांना लोकसभेची उमेदवारी जाहीर झालेली आहे. राज्यातील शिवसेना व भाजपा महायुतीच्या लोकसभेच्या सर्व उमेदवारांना शिवशाही व्यापारी संघाने बिनशर्त जाहीर पाठींबा दिला आहे.
याबाबत प्रदेश अध्यक्ष युवराज दाखले यांनी प्रसिद्धीपत्रक काढले असून त्यात म्हटले आहे की, मी युवराज भगवान दाखले प्रदेश अध्यक्ष शिवशाही व्यापारीसंघ, गणेश आहेर प्रदेश सचिव शिवशाही व्यापारी संघ, सुनिता खंडाळकर प्रदेश कार्याध्यक्षा महीला आघाडी, भाग्यश्री म्हस्के प्रदेश उपाध्यक्षा तसेच महीला आघाडीच्या सर्व पदाधिकारी यांनी एकजुट व एकदिलाने सर्व सवंगड्याच्या सोबत महायुतीच्या लोकसभेच्या सर्व अधिकृत उमेदवारांना जाहीर पाठींबा देत आहोत.
प्रामुख्याने साहेब मावळ लोकसभेवरती भगवा झेंडा फडकविण्यासाठी मावळ गड राखण्यासाठी तसेच संपूर्ण महाराष्ट्रात भगवा झेंडा डोलाने फडकविण्यासाठी सज्ज आहे. मी बहुजन समाजातील मातंग समाजाचा वंदनिय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा नम्र शिपाई असून, भविष्यात आपल्या मार्गदर्शनाखाली अखंड बारा बलुतेदार समाज बांधवांचे नेतृत्व करण्यासाठी पिंपरी विधानसभा मतदार संघातुन नियोजन करीत आहे. आपला आशीर्वाद मिळावा हीच मनपूर्वक अपेक्षा.
मी शिवशाही व्यापारीसंघाच्या माध्यमातून व्यापारीवर्गाच्या व सर्वसामान्य जनतेच्या सेवेसाठी माझ्या सवंगड्याच्या सोबत शिवसेना वाढविण्यासाठी सदैव कटिबद्द राहणार आहे, असा विश्वास व वचन शिवसेना उपनेत्या आमदार निलमताई गोऱ्हे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना सचिव अनिल देसाई, मिलींद नार्वेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरेसाहेब यांना दिले आहे.
यावेळी शिवशाही व्यापारीसंघ प्रदेश अध्यक्ष युवराज दाखले, प्रदेश सचिव गणेश आहेर, प्रदेश उपाध्यक्ष गोरख पाटील, माऊली जाधव, मारूती म्हस्के, बाळासाहेब गायकवाड, धाराशिव उस्मनाबाद जिल्हाअध्यक्ष प्रशांत पोचापुरे, सातारा जिल्हाअध्यक्ष रमेश दाखले, उल्हासनगर, महात्मा गांधीनगर अध्यक्ष कृष्णा गायकवाड, मोहीत सुलाखे, संभाजीनगर (औरंगाबाद) जिल्हा अध्यक्ष नितीन देशमुख, बबलु वाणे, खलापुर तालुका अध्यक्ष छगन राठोड, कर्जत तालुका अध्यक्ष सुहास ठाकरे, नवी मुंबई बेलापुर विधानसभा अध्यक्ष, मिथुन खोपडे, नवनिर्वाचित मुंबई अध्यक्ष योगेश घोरपडे, शिवशाही व्यापारीसंघ महिला अघाडी प्रदेश कार्याध्यक्षा सुनिता खंडाळकर, प्रदेश उपाध्यक्षा भाग्यश्री म्हस्के, पुणे शहर महीला अघाडीच्या शहर उपध्यक्षा महादेवी जळकोटे, संगिता नाईक आदी पदाधिकारी मोठ्या संखेने उपस्थित होते.










