न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २५ जुलै २०२३) :- माजी मुख्यमंत्री व शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त रजनी रघुनाथ वाघ आणि कशिश सोशल फाउंडेशन यांच्या वतीने (दि. 2४) सोमवारी गिरीराज, बिजलीनगर, प्रभाग १७ येथे मोफत सॅनिटरी पॅड, एच.पी.व्ही. व्हॅकसिन (गर्भाशयाचे कन्सर) वाटप व आरोग्यविषयक जनजागृती शबिराचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी कशिश सोशल फाऊडेशनचे अध्यक्ष योगेश पवार, सिने कलाकार हास्य अभिनेता सुनिल गोडबोले, शिवसेनेच्या जिल्हा संघटीका सुलभाताई उबाळे, डॉ. योगिता, प्रियांका मिसाळ, अंजली रघुनाथ वाघ, अर्चना महाडे, रोहित गोडबोले, शहर संघटीका अनिता तुतारे, शहर संघटक संतोष सौंदणकर, विभाग प्रमुख संदिप भालके, पिंपरी विधानसभा समन्वयक वैभवी घोडके, वैशाली कुलथे, विभाग संघटीका वैशाली काटकर, शिल्पा आंनपण, गीता कुसाळकर, कलावती नाटेकर, उपविभाग संघटीका योगिनी मोहन, वंदना खंडागळे, तस्लीम शेख, कामिनी मिश्रा, वाघमारे, ज्योती भालके, गायत्री कोऱ्हाळे, युवराज आहिरे, शाखा प्रमुख सचिन साळुंखे, किशोर बागुल आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन उज्वला देशमुख्य यांनी तर, आभार रजनी वाघ यांनी मानले.