न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १ एप्रिल) :- नगरसेवक मयूर कलाटे व माजी नगरसेविका स्वाती कलाटे यांच्या नेतृत्वाखाली वाकड येथे रविवार (दि. ३१ मार्च) रोजी महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.
यास कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या निता पाटील, माजी नगरसेविका स्वाती मयूर कलाटे, नगरसेवक मयूर कलाटे, अश्विनी पाटील, विभा बोके, अदिती कदम, सुचित्रा घाटगे, मंजिरी कदम, मणिषा कदम, पूजा कदम, आरती राव, स्मिता पाल्हाळ, वैशाली काळभोर, आश्विनी क्षीरसागर आदींसह सुमारे ६०० महिला उपस्थित होत्या.
यावेळी स्वाती कलाटे म्हणाल्या की, राष्ट्रवादीचे उमेदवार पार्थ पवार यांच्या प्रचारात आता महिला पदाधिकारी आणि कार्यकर्त्या देखील सक्रिय झाल्या आहेत. वाकडमध्ये महिलांचे संघटन तयार करून, त्यांना संबोधीत केले जात आहे. अनेक महिलांनी सकाळी, दुपारी आणि सायंकाळी अशा तीन सत्रात लोकांच्या भेटी-गाठी घेऊन, पक्षाने केलेल्या विकास कामांची माहिती घराघरात पोहोचविण्याची मोहिम आखलेली आहे. त्याला महिला वर्गाचा प्रतिसाद मिळत आहे. महिलांचा मेळावा, बैठका, भेटी-गाठी घेऊन, पार्थ पवार यांचा प्रचार केला जात आहे. त्याला महिलांचाही प्रचंड प्रतिसाद मिळत आहे, असे त्या यावेळी म्हणाल्या.











