न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १ एप्रिल) :- मावळ लोकसभा मतदार संघाचे राष्ट्रवादीचे उमेदवार पार्थ अजित पवार यांच्या प्रचारार्थ राष्ट्रवादीचे नेते नगरसेवक विठ्ठल ऊर्फ नाना काटे आणि नगरसेविका शीतल काटे यांच्या वतीने प्रचार मोहिम राबविण्यात येत आहे. ‘माझी निवडणूक, माझा खासदार’ या माध्यमातून घराघरात प्रचाराची यंत्रणा पोहोचणार आहे.
पिंपरी-चिंचवड शहरासह पुणे आणि बारामतीच्या विकासाचे चित्र बदलणारे राष्ट्रवादीचे कारभारी अजित पवार आणि पार्थ पवार यांच्या हस्ते प्रचार मोहिमेचा शुभारंभ झाला आहे.
पिंपळे सौदागर येथील नेते काटे यांच्या संपर्क कार्यालयातून याची सूत्रे हलणार आहेत. नागरिकांच्या घराघरात जाऊन जनमानसांमध्ये नेते शरद पवार आणि अजित पवार यांनी केलेली विकासकामे आणि त्यांची काम करण्याची हातोटी पार्थ पवार यांच्या माध्यमातून शहराला लाभणार आहे. त्यामुळे पार्थ पवार यांना निवडून देण्याची किती गरज आहे, हे नागरिकांना पटवून सांगितले जाणार आहे.
नागरिक आणि नव मतदारांना जागरूक करण्यासाठी ‘माझी निवडणूक. माझा खासदार.’ या ब्रिदवाक्याखाली खासदार म्हणून उमेदवाराची निवड कशी करावी, याची माहितीच सांगितली जाणार आहे. सोशल मीडियाद्वारे याची माहिती शेअर केली जाणार आहे. जास्तीत जास्त तरुणांनी ही माहिती घराघरात पोहोचविण्याचे आवाहन काटे यांनी केले आहे.











