- शेजारी राहणाऱ्या तरुणाकडून महिलेला धमकी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २७ जुलै २०२३) :- लग्न झालेले असताना देखील फिर्यादी महिलेला वारंवार फोन केला. मॅसेज करुन ‘तु माझ्याशी लग्न कर, तु तुझ्या नव-याला सोडुन दे, तु माझ्या जवळ ये, तुझे लग्न झाले आहे, तरी मला काही फरक पडत नाही, जर माझ्याशी लग्न केले नाही तर तुझे आई व आजोबा हितेच राहतात त्यांना मी काहीही करेल’, अशी फिर्यादी महिलेच्या घरा शेजारी राहणाऱ्या फिर्यादीच्या आरोपी मित्राने धमकी दिली. तसेच फिर्यादी या गरोदर होत्या. त्या हॉस्पिटलमध्ये जात असताना फिर्यादीचा पाठलाग करून त्यांच्या मनास लज्जा उत्पन्न होईल अशी कृती केली, असे फिर्यादीत म्हटले आहे.
हा प्रकार सन २०१८ ते मार्च २०२३ पर्यंत वा चे दरम्यान पिंपळे गुरव आणि फोनद्वारे घडला. महिला फिर्यादीने आरोपी अक्षय अंकुश निरगुडे याच्या विरोधात फिर्याद दिली आहे.
सांगवी पोलिसांनी ३५९ / २०२३भा. दं.वि कलम ३५४ (ड), ५०६, ५०७ प्रमाणे आरोपीवर गुन्हा दाखल केला आहे. पोउपनि म्हैसाळे हे घटनेचा पुढील तपास करीत आहेत.















