न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २८ जुलै २०२३) :- कुदळवाडी चिखली परिसरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडविण्यासाठी आज शुक्रवारी तळवडे चिखली वाहतूक विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत तातडीची बैठक संपन्न झाली.
या बैठकीला ठाणे पोलीस अधीक्षक अमर वाघमोडे, अनुम माने, क्षेत्रीय अधिकारी सिताराम बहुरे महानगरपालिकेचे कार्यकारी अभियंता विजय कुमार काळे स्वी. सदस्य दिनेश यादव, संतोष मोरे, माजी नगरसेवक पंकज भालेकर, जितेंद्र यादव, विकास साने, दादा किवळे, रामेश्वर पाचारे व नागरिक उपस्थित होते.
चिखली परिसरातील वाढत्या वाहतूक कोंडीला अवजड वाहतूक मोठ्या प्रमाणावर कारणीभूत असल्याने या वाहतुकीचे नियोजन करण्यासाठी प्रमुख मार्गावर असलेले डिपी रोड तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच वाहतूक वार्डन ची संख्या वाढवणे, रस्त्यावर असलेले खड्डे बुजविणे, रस्त्यावर असलेले अतिक्रमण हटवणे, डिवायडर बंद करणे असे महत्वाचे निर्णय घेण्यात आले


















