न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २८ जुलै २०२३) :- पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आरोग्य विभागाचे प्रमुख सहाय्यक आयुक्त यशवंत डांगे यांच्याकडे स्वच्छ भारत व महाराष्ट्र अभियान कक्षाचे समन्वयक म्हणून जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
प्रशासन अधिकारी सोनल देशमुख यांची कल्याण-डोंबविली महापालिकेच्या सहाय्यक आयुक्तपदी पदोन्नती झाल्याने त्यांना महापालिकेतून कार्यमुक्त करण्यात
आले आहे. त्यांच्याकडे स्वच्छ अभियान कक्षाचे समन्वयक म्हणून जबाबदारी होती.
आता आरोग्य विभागाचे प्रमुख सहाय्यक आयुक्त डांगे यांच्याकडेच ती जबाबदारी सोपविण्यात आली आहे. या बाबतचा आदेश सामान्य प्रशासन विभागाचे उपायुक्त विठ्ठल जोशी यांनी जारी केला आहे.


















