- शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त विधायक उपक्रम…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २९ जूलै २०२३) :- शिवसेना पक्षप्रमुख तथा राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेनेच्या चिंचवडगावातील वेताळनगर शाखेमध्ये महापालिका व इंपॅक्ट गुरु फाउंडेशन यांच्या वतीने तीन दिवसीय आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी लहान मुलांचे लसीकरण आणि आरोग्य तपासणी करण्यात आली. या शिबिराला परिसरातील नागरिकांचा उस्फुर्त प्रतिसाद मिळाला. अनेकांनी आरोग्याबाबत जागृत राहून विविध आजारांवरील तपासणी आणि औषध उपचार घेतले.
आरोग्य शिबीर यशस्वी करण्यासाठी चिंचवड विधानसभा प्रमुख अनंत कोऱ्हाळे, शहर संघटक संतोषभाऊ सौंदणकर, शाखा प्रमुख मज्जिद शेख, उपशाखा प्रमुख किशोर सातपुते, उपविभाग प्रमुख कुदरत खान, उपविभाग संघटिका कलावती नाटीकर, महेश शेतसंधी, संतोष अवचिते, सुनील बोराडे, खय्युम पठाण व इतर सर्व शिवसैनिकांनी परिश्रम घेतले.


















