न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३० जुलै २०२३) :- केंद्रीय स्तरावरील मान्यताप्राप्त अखिल भारतीय सफाई मजदूर संघाच्या नुकत्याच झालेल्या महाराष्ट्र प्रदेश बैठकीत पिंपरी चिंचवड शहराध्यक्षपदी दिव्या सागर चरण यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.
त्या पुण्यातील ससून सर्वोपचार जिल्हा रुग्णालयाच्या तक्रार निवारण समिती सदस्या म्हणून त्या सध्या कार्यरत आहेत. यापूर्वी त्यांना समाजभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. गेल्या महिन्यात मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रात कर्तव्य बजावताना दगावलेल्या कामगारांच्या कुटुंबीयांना त्यांनी न्याय मिळवून दिला आहे. त्यांच्या माध्यमातून पिंपरी चिंचवडमध्ये विविध स्वच्छता अभियान, रक्तदान शिबिरे राबविण्यात आली.
देशाचे कायदामंत्री अर्जुन राम मेघवाल हे अखिल भारतीय सफाई मजदूर संघाचे संघर्ष राष्ट्रीय संरक्षक आहेत. राजपाल मेहरोलिया हे राष्ट्रीय महासचिव त्यांच्या शिफारसीने ही निवड करण्यात आली आहे. संघटनेचे प्रदेशाध्यक्ष मनोज पटेलिया यांनी निवडीचे पत्र दिले आहे. यावेळी राजेश्री काळे मा. नगरसेविका, तक्रार निवारण समिती सदस्य प्रताप सोलंकी, बी.जे पीवाल, समस्त प्रदेश कार्यकारिणी व कार्यकर्ते उपस्थित होते. या निवडीबद्दल दिव्या चरण यांचे वाल्मिकी समाज, सफाई कामगारांच्या माध्यमातून सर्व स्तरातून अभिनंदन केले जात आहे.















