न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३० जुलै २०२३) :- गुरुपौर्णिमा विशेष कार्यक्रम ग. दी. माळगुळकर सभागृह येथे यशस्वीरित्या पार पडला. देओरे सर, प्रसिद्ध तबलावादक डॉ. अतुल कांबळे व भाग्यश्री पेंधे कांबळे, गजानन अंतुरकर यांच्या उपसथितीमध्ये कार्यक्रमाची सुरुवात झाली.
विद्यालयातील मुलांनी गुरूंचे गुरुपुजन केले. भारतीय शास्त्रीय संगीत संगीतातील प्रचलित राग व त्यावर आधारित गाणी अशी संकल्पना असलेल्या कार्यक्रमात विद्यालयातील विद्यार्थ्यांनी अतिशय सुंदर असे सादरीकरण केले. त्याचप्रमाणे स्नेहछाया परिवारतील मुलांनी देखील सुंदर अशी प्रार्थना सादर केली. नंतर गुरुगायन झाले.
मंगेश दंडारे व कल्याणी मंगेश दंडारे यांनी गझल व अभंग सादर केले व भैरवी ने कार्यक्रमाचा शेवट झाला. कार्यक्रमात विद्यार्थ्यांचे पालक उपस्थित होते. तसेच मुलांचे आजी आजोबा नातलग मित्र परिवार यांनी हजेरी लावून कार्यक्रमाची शोभा वाढवली. तबल्यावर साथ अशोक मांडवे, पखवाज पंढरी दरेकर, गिटार सुनील राठोड यांनी दिली.
कार्यक्रमाचं सूत्रसंचालन पुनर्वसु इंगळे यांनी तर, आभार प्रदर्शन कल्याणी दंडारे यांनी केले.












