- पिंपरी चिंचवड शहरात मंदिर उभारणी आणि अनाथांसाठी देखील केली आर्थिक मदत…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३१ जुलै २०२३) :- आष्टी तालुक्यातील खुंटेफळ (वाटेफळ) गावचे सुपुत्र आणि पिंपरी चिंचवड शहर भाजपच्या वाहतूक आघाडीचे शहराध्यक्ष दीपक मोढवे पाटील यांचा नेहमीच सामाजिक कार्यात हिरारीने सहभाग राहिला.
संततधार पावसामुळे गावच्या रस्त्याची दुर्दशा झाल्याने ग्रामस्थांची चांगलीच तारांबळ उडाली होती. रस्त्याअभावी ग्रामस्थांची होणारी हेळसांड पाहून दीपक मोढवे पाटील यांनी त्वरित रस्त्याची डागडुजी सुरु केली. रस्त्यावर मुरूम टाकून जेसीबीच्या सहाय्याने रस्त्यावरील खड्डे बुजवले. रस्ता पूर्वरत करून गावच्या लोकांची रहदारीची चिंता मिटविली.
पिंपरी चिंचवड शहरात देखील त्यांचा मदतीचा ओघ सुरूच असतो. म्हणनूच त्यांची समाजात दानशूर म्हणून देखील ओळख आहे. नुकतीच त्यांनी निगडी, यमुनानगर येथील राम मंदिर उभारणीसाठी आणि चिंचवड येथील मातोश्री अनाथ आश्रमासाठी मोठ्या स्वरुपात आर्थिक मदत केली. त्यामुळे अनेकांना दिलासा मिळाला.
” समाजात कार्यरत असताना त्यांच्यासाठी काहीतरी आपणं देणं लागतो, ही भावना उराशी बाळगून जमेल तसे समाजकार्य करीत असतो. त्यामुळे अनेकांची मदत होते. त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद मला पुढील कार्यासाठी सकारात्मक उर्जा मिळवून देतो. ”
– मा. दीपक मोढवे पाटील, शहराध्यक्ष – भाजपा वाहतूक आघाडी…


















