न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०२ ऑगस्ट २०२३) :- नवसंकल्प फाउंडेशन पिंपरी-चिंचवड या संस्थेच्या माध्यमातून रविवारी घोरावडेश्वर येथील डोंगरावर सुमारे ५१ देशी वृक्षांचे रोपण करण्यात आले. नवसंकल्प फाउंडेशनच्या सभासदांचा पती – पत्नी आणि परिवारासह सहभाग हे या वृक्षारोपणाचे आगळेवेगळे वैशिष्ट्य होते.
त्यामध्ये हेमंत बागल, मृणाल बागल, संजीत म्हेत्रे, पूनम म्हेत्रे, सतीश सूर्यवंशी, श्रद्धा सूर्यवंशी, मोहन आगलावे, पल्लवी आगलावे, दामोदर टाकळकर, धनश्री टाकळकर, सय्यद एजाज, सय्यद आर्शिया, विशाल म्हेत्रे, मोहिनी म्हेत्रे, रवी वीरमणी, चांदणी वीरमणी, रूपेश भुजबळ, ॲड. सारिका भुजबळ, पिंपरी – चिंचवड ॲडव्होकेटस् बार असोसिएशनचे सचिव ॲड. गणेश शिंदे, स्नेहा शिंदे या दांपत्यांसह सुनील म्हेत्रे, शैलेश सुपेकर, ॲड. गणेश फिरोदिया यांनी सहभाग घेतला.
पिंपरी – चिंचवड ॲडव्होकेटस् बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष ॲड. राजेश पुणेकर यांचे विशेष सहकार्य या उपक्रमासाठी लाभले; तर बॉश कंपनीच्या वतीने वड, पिंपळ, चिंच, कडूलिंब, जांभूळ अशा प्रकारची ५१ रोपं उपलब्ध करून देण्यात आलीत.











