न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. 4 जुलै 2023) :- चिंचवडमधील प्रा. रामकृष्ण मोरे सभागृह येथे रविवारी (दि. 6) रोजी अति महत्वाच्या व्यक्ती कार्यक्रमाकरीता येणार आहेत. या कार्यक्रमास मोठ्या संख्येने कार्यकर्ते, प्रतिनिधी इतर नागरीक उपस्थित राहणार आहेत.
व्हीव्हीआयपी बंदोबस्ताच्या अनुषंगाने चिंचवड वाहतुक विभाग हद्दीतील वाहनांसाठी (दि. 6) रोजी सकाळी 8 ते दुपारी 3 पर्यंत अथवा वाहतुक सुरळित होईपर्यंत काही रस्ते बंद करण्यात येणार आहेत.
दरम्यान चिंचवड येथील महावीर चौकाकडुन चिंचवडगांवाकडे जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंदी करण्यात आली आहे.
ही वाहने महावीर चौकाकडुन खंडोबा माळ चौक येथुन इच्छित स्थळी जातील. दर्शन हॉल लिंक रोडकडुन अंहिसा चौकाकडे येणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंदी करण्यात आली आहे. वाहने ही मोरया हॉस्पीटल चौक कडुन इच्छित स्थळी जातील.
रिव्हर व्हयुव चौकाकडुन चाफेकर चौक, अहिंसा चौक बाजुकडे जाण्यास सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंद करण्यात येत आहे. सदरचे वाहने हे रिव्हर व्हीव चौकाकडुन वाल्हेकरवाडी, बिजलीनगर मार्गे इच्छित स्थळी जातील, असे वाहतुक विभागाकडून कळविण्यात आले आहे.














