न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०५ ऑगस्ट २०२३) :- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या उद्यान आणि वृक्षसंवर्धन विभागाच्या वतीने स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षापूर्ती निमित्ताने दि. १ ते १५ ऑगस्ट दरम्यान वृक्षारोपण उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमाला वृक्षारोपण पंधरवडा असे संबोधण्यात आले असून शहरात ७५ ठिकाणी वृक्षारोपण करण्यात येणार आहे. आज या उपक्रमाचा चौथा दिवस पार पडला.
या वृक्षारोपण उपक्रमांमध्ये उद्यान विभाग प्रमुख रविकिरण घोडके यांच्या मार्गदर्शनाखाली पालिकेचे अधिकारी, कर्मचारी, सामाजिक कार्यकर्ते आणि परिसरातील नागरिकांनी वृक्षारोपण मोहीमेत सक्रीय सहभाग घेतला.
इसी ३४ जे ब्लॉक भोसरी व मराठा चेंबर्स रोड एमआयडीसी रोड, भोसरी येथे वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी सहाय्यक उद्यान अधीक्षक मंजुषा हिंगे, उद्यान सहाय्यक सुहास सामसे, मॅनेजिंग डायरेक्टर धनंजय दबके तसेच देवेंद्र जोशी, संतोष वळसे पाटील, सोमनाथ कुदळे, भानुदास तापकीर आदी मान्यवर उपस्थित होते.
याव्यतिरिक्त साधू वासवानी रोड, शास्त्रीनगर या ठिकाणीही महापालिकेच्या वतीने वृक्षारोपण करण्यात आले. या कार्यक्रमास अधिकारी, विद्यार्थी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.














