न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०५ ऑगस्ट २०२३) :- चैनचोरी करणाऱ्या सराईत गुन्हेगारांना भोसरी पोलीसांकडुन ४८ तासात जेरबंद करण्यात आले आहे. राहुल रमेश चव्हाण (वय २४ वर्षे रा. भारतमातानगर दिघी) व करणसिंग सुरजितसिंग भादा (वय २० वर्षे रा. दिघी) असे अटक आरोपींची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मोटार सायकलवरुन आलेल्या अनोळखी दोन चोरट्यांनी गवळीनगर, भोसरीत एका महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र जबरदस्तीने हिसकावून चोरी करुन नेले होते. त्यानंतर थोड्याच वेळात भोसरी परीसरामध्ये आणखी दोन वेगवेगळ्या ठिकाणी अशाच पध्दतीने मोटार सायकल वरुन आलेल्या दोन अनोळखी चोरट्यांनी महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र जबरदस्तीने हिसकावून चोरटे मोटार सायकलवर निघुन गेल्याच्या घटना घडल्या होत्या. या घटनेमध्ये चोरट्यांनी नंबर प्लेट नसलेली मोटार सायकल व अंगात काळे रेनकोट परीधान करुन तोंड रुमालाने झाकुन ओळख लपविण्याचा पुर्ण प्रयत्न केला होता.
आरोपींनी आपली ओळख उघड होणार नाही याची पुर्ण खबरदारी घेतल्याने व पाउस असल्याने सी. सी. टी. व्ही. फुटेजमध्ये आरोपीबाबत कोणतीही स्पष्ट माहीती मिळुन येत नव्हती. तपास पथकाचे अधिकारी व अमलदार यांनी परीसरातील घटना घडलेल्या परीसरात बारकाईने पाहणी करुन मुख्य रस्त्यासह गल्लीबोळातील १५० पेक्षा जास्त सी.सी.टी.व्ही. कॅमेरे तपासून चैनचोरी करणाऱ्या अज्ञात चोरट्यांना परतीच्या मार्गावर माग घेतला, तेव्हा आरोपी हे दिघी परीसरात गेलेले असल्याची पोलिसांना माहीती मिळाली. त्यानंतर तपास पथकाने आरोपीची ओळख पटविली व (दि.२९/०७/२०२३) रोजी सदर गुन्ह्यातील आरोपी हे सी. एम.ई. भीतीलगत आदर्शनगर दिघी परीसरात बसले असल्याची माहीती मिळाली. तपास पथकाचे अधिकारी व अंमलदार यांनी वेगवेगळे पथके तयार करून दिघी परीसरात सी. एम. ई लगत कौशल्यपूर्ण पद्धतीने छापा टाकला.
राहुल आणि करणसिंग यांना ताब्यात घेतले. त्यांनी तपासात सदर गुन्ह्याची कबुली दिली असून त्याच्याकडे तपास केला असता भोसरी पोलीस स्टेशनच्या हद्दीत तीन चैनचोरी, दोन घरफोडी, दोन चोरीचे असे एकुण ०७ गुन्हे उघडकीस आले. त्यांच्याकडुन एकूण ४,३५,००० रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात यश आले आहे.
सदरची कामगिरी पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, पोलीस सह आयुक्त डॉ. संजय शिंदे, अपर पोलीस आयुक्त वसंत परदेशी, पोलीस उपायुक्त परिमंडळ विवेक पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त, पिंपरी विभाग सतीश कसबे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक भास्कर जाधव यांच्या प्रत्यक्ष मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरिक्षक कल्याण घाडगे, पोलीस उप-निरीक्षक मुकेश मोहारे, तसेच सहा. पोलीस फौज, राकेश बोयणे, घो. अं. हेमंत खरात, नवनाथ पोटे, सागर जाधव, सचिन सातपुते, प्रभाकर खाडे, तुषार वराडे, आशिष गोपी, स्वामी नरवडे, महिला अंमलदार प्रतिमा मुळे, सुषमा पाटील, भाग्यश्री जमदाडे यांनी सदरची उल्लेखनीय कामगिरी केली आहे.














