न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०६ ऑगस्ट २०२३) :- केंद्र सरकार बहुराज्यीय सहकारी संस्थांना (मल्टीस्टेट) त्यांच्या व्यवसायात सुलभता वाढविण्यासाठी डिजिटलवर भर देत आहे. याचाच एक भाग म्हणून केंद्राने विकसित केलेल्या बहुउद्देशीय सहकारी संस्था एकात्मिक पोर्टलच्या उद्घाटनासाठी आज रविवारी सहकारमंत्री अमित शहा हे पिंपरी चिंचवड शहरात आले होते.
यावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे आज रविवारी साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची चरित्रपुस्तिका देऊन पिंपरी विधानसभा निवडणूक प्रमुख अमित गोरखे यांनी स्वागत केले. याप्रसंगी भाजपचे विलास मडिगेरी, अनुप मोरे, काळूराम बारणे आदि उपस्थित होते.














