- पिंपरीतील घटना; अज्ञातावर गुन्हा दाखल…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०६ ऑगस्ट २०२३) :- वृद्ध महिला घरात एकटीच रहात असल्याचा फायदा घेवुन अज्ञात आरोपीने घराचा सिमेंटचा पत्रा तोडुन फोडुन घरात प्रवेश केला. वृद्ध महिलेच्या डोक्यात कठीण वस्तुने मारुन तिचा खून केला.
मयत महिलेच्या अंगावरील व घरातल्या कपाटातील १,०४,५०० रुपये किमतीचे ४ तोळे वजनाचे सोन्याचे दागिने तसेच मोबाईल फोन जबरदस्तीने चोरी करुन नेला आहे. हि घटना (दि. ३०/०७/२०२३ रोजी रात्री १०.३० ते दि. ३१/०७/२०२३ रोजी १०.३०) दरम्यान सॅनेटरी चाळ, पिंपरी रेल्वे स्टेशन जवळ, पिंपरी येथे घडली.
महीला फिर्यादी यांनी आरोपी अज्ञात इसमाच्या विरोधात फिर्याद दिली आहे. पिंपरी पोलिसांनी ८२८/२०२३ भादवि कलम ३०२, ३९२, ४५७, ४२७ प्रमाणे अज्ञात आरोपीवर गुन्हा दाखल केला आहे. सपोनि डोंब पुढील तपास करीत आहेत.














