- कर्नाटकातील ग्रामपंचायत निवडणुकीचं लोण पिंपरी चिंचवड शहरात…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०६ ऑगस्ट २०२३) :- आयनोळ्ळी ग्रामपंचायत निवडणुकीत विरोधी पक्षाला बहुमत आणि सरपंचपद मिळावे या उद्देशाने आरोपींनी आपआपसात संगणमत केले. फिर्यादी हे कृष्णाई लॉज, टॉवरलाईन, सहयोगनगर येथे मुक्कामास असताना (दि. ४) रोजी रात्री ८.१० च्या सुमारास फिर्यादीच्या गावाकडील ओळखीच्या आरोपी दहा जणांनी फिर्यादीसह सात जणांना जिवे मारण्याची धमकी देत त्यांना पांढऱ्या रंगाच्या दोन इर्टिका, एक स्विफ्ट व एक इंडीका या चारचाकी चार वाहनांमधुन जबरदस्तीने त्यांचे अपहरण केले.
फिर्यादीकडील रोख १९,००० रुपये व ओपो कंपनीचा मोबाईल तसेच साक्षीदाराचा सॅमसंग कंपनीचा मोबाईल त्यामध्ये एअरटेल कंपनीचे सिम व त्यांच्याकडील ८,५०० रुपयांसह मारहाण करण्याची धमकी देत त्यांच्यासह उर्वरित चार ग्रामपंचायत सदस्यांचे अपहरण करून जबरदस्तीने नेले.
फिर्यादी विरसिंग सेऊ पवार यांनी आरोपी लोकेश बाबुराव फतेपुरकर व त्याच्याबरोबर इतर ८ इसम, विजयकुमार माडगी यांच्या विरोधात फिर्याद दिली आहे. चिखली पोलिसांनी ५२१/२०२३ भादवि कलम ३९५, ३६५, ५०६ (२) प्रमाणे आरोपींच्या विरोधात फिर्याद दिली आहे. सहायक पोलीस निरीक्षक गुमाने घटनेचा पुढील तपास करीत आहेत.














