- विधानसभानिहाय भेटीगाठी आणि बैठकांचे सत्र सुरु..
- नव्याने पक्षबांधणी आणि संघटनवाढीस मोठा प्रतिसाद – संतोष सौंदणकर…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०७ ऑगस्ट २०२३) :- आगामी महापालिका आणि लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाकडून पिंपरी चिंचवड शहरात भेटीगाठी आणि बैठकांचे सत्र सुरु आहे. भोसरी आणि पिंपरी विधानसभेनंतर शिवसेनेने आपला मोर्चा चिंचवड विधानसभेकडे वळविला आहे. उद्या मंगळवारी (दि. ८) रोजी चिंचवड विधानसभेतील प्रभाग, शाखानिहाय भेटीगाठी आणि बैठकांचे आयोजन करण्यात आले आहे.
यावेळी जिल्हाप्रमुख ॲड. गौतम चाबुकस्वार, उपजिल्हाप्रमुख रोमी संधू, हाजी दस्तगीर मण्यार, शहरप्रमुख अँड. सचिन भोसले,महिला शहर संघटीका अनिता तुतारे, विधानसभा प्रमुख अनंत कोऱ्हाळे, चिंचवड विधानसभा शहर संघटक संतोष सौंदणकर, दिलीप भोंडवे,उपशहर प्रमुख हरेश नखाते, नवनाथ तरस, श्रीमंत गिरी, सुधाकर नलावडे,संतोष पवार, विभागप्रमुख संदीप भालके, संतोष तरस, सचिन चिंचवडे, नितीन दर्शले, मारुती दाखले, गोरख पाटील, प्रशांत तरवटे, किरण दळवी, महिला आघाडी आणि युवा सेना, सर्व पदाधिकारी आणि शिवसैनिक उपस्थित राहणार आहेत.
दरम्यान शिवसेना पदाधिकारी हे चिंचवड विधानसभेतील वाल्हेकरवाडी, गुरुद्वारा, किवळे, मामुर्डी, रावेत, चिंचवड गावठाण, पुनावळे, रहाटणी, काळेवाडी, ज्योतिबानगर, तापकीरनगर, विजयनगर, पवनानगर, आदर्शनगर येथील प्रभाग आणि शाखांना भेटी देणार आहेत. भेटी दरम्यान बैठकीत विभाग प्रमुख आणि शिवसैनिकांच्या समस्या जाणून घेत त्या सोडविण्यावर भर देणार आहेत. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदी विराजमान असताना केलेल्या चांगल्या आणि लोकोपयोगी कामांची लोकांमध्ये जनजागृती व्हावी, यासाठी विभागप्रमुख आणि शिवसैनिकांना मार्गदर्शन करणार आहेत, अशी माहिती चिंचवड विधानसभा संपर्कप्रमुख दिलीप घोडेकर यांनी दिली.
‘गेले ते कावळे आणि राहिले ते मावळे’ या उक्तीला अनुसरून शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरेसाहेब यांच्या नेतृत्वाखाली खरा निष्ठावंत शिवसैनिक पुन्हा उभारी घेत एकत्र येत आहे. राज्यभरात नव्याने पक्षबांधणी आणि संघटन वाढीसाठी प्रयत्न होत आहेत. त्यास मोठा प्रतिसादही मिळत आहे. दरम्यान शिवसेना नेते तथा खा. संजय राऊत, उपनेते तथा समन्वयक रवींद्र मिर्लेकर, पुणे जिल्हा संपर्कप्रमुख तथा आ. सचिन अहिर यांच्या आदेशानुसार व चिंचवड विधानसभा संपर्कप्रमुख दिलीप घोडेकर यांच्या उपस्थितीत उद्या मंगळवारी (दि. ८) रोजी चिंचवड विधानसभेतील प्रभाग आणि शाखानिहाय भेटीगाठी तसेच बैठकांचे आयोजन करण्यात आले आहे. या बैठकीस चिंचवड विधानसभेतील शिवसनिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे. – – मा. अनंत कोऱ्हाळे – चिंचवड विधानसभा प्रमुख…

















