न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०७ ऑगस्ट २०२३) :- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने साहित्यरत्न, लोकशाहीर अण्णा भाऊ साठे जयंती निमित्त महापालिकेच्या वतीने ५०० झाडांचे वृक्षारोपण करण्याचा उपक्रम राबविण्यात येत आहे. त्यापैकी ५० झाडांचे वृक्षारोपण नुकतेच करण्यात आले.
यावेळी माजी नगरसेवक मारुती भापकर, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती उत्सव समिती अध्यक्ष अण्णासाहेब कसबे, कार्याध्यक्ष सचिन दुबळे, सचिव नितीन घोलप तसेच मनोज तोरडमल, संजय ससाणे, अरुण जोगदंड, दत्तू चव्हाण, डी.पी खंडागळे, गणेश साठे,विशाल कसबे, विठ्ठल कळसे, भानुदास साळवे, उद्यान विभागाचे नंदकुमार ढवळसकर, भाऊसाहेब सगरे, सिदेश्वर कडाळे, भागुजी बोकटे, सुरेश कोळेकर, उद्यान सहाय्यक सुरेश हुलावळे आदी उपस्थित होते.
प्रदूषणाचे प्रमाण कमी करण्याच्या दृष्टीने जयंती महोत्सवाच्या वेळी ५०० झाडे लावण्याचा उपक्रम राबविण्यात यावा अशी मागणी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष अण्णासाहेब कसबे यांनी महापालिकेकडे केलेली होती, त्यास अनुसरून महापालिकेच्या उद्यान विभागाचे प्रमुख रविकिरण घोडके यांच्या मार्गदर्शनाखाली ५० झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले असून उर्वरित झाडेही लवकरच लावण्यात येणार आहेत.















