न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०८ ऑगस्ट २०२३) :- पत्नीच्या जामीनासाठी पैशांची गरज म्हणून शेजारच्या आजीबाईचे दागिने लुटून त्यांचा खून करणाऱ्या विधी संघर्षित बालकास पिंपरी पोलीसांनी घेतले ताब्यात घेतले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दाखल गुन्हा हा अतिशय गंभीर स्वरूपाचा असल्याने पिंपरी पोलिसांनी दोन तपास पथके तयार केली. तपासा दरम्यान घटना घडलेले ठिकाण हे मिश्रवस्तीत असून त्या भागात राहणारे, तसेच जबरी चोरी व इतर चोरी करणारे गुन्हेगार व विधी संघर्षित बालक यांची माहिती घेवून त्यांच्या हालचालीवर पोलिसांनी लक्ष ठेवले.दरम्यान पिंपरी पोलीस ठाणे रेकॉर्डवरील व त्याच भागात राहणारा एक विधीसंघर्षित मुलगा घटना घडल्यापासून त्या भागात दिसून येत नसल्याची माहिती प्राप्त झाली. विधी संघर्षित बालकाची माहिती घेत असताना तो सतत राहती ठिकाणेही बदलत असल्याची माहिती प्राप्त झाली. सदर विधी संघर्षित बालकाचा पारंपारिक पद्धतीने पाठपुरावा करीत असताना, तो (दि. ७) रोजी पिंपरी भाजी मंडईच्या आवारात लपत-छपत फिरत असल्याचे पोलिसांना दिसून आले. त्याला ताब्यात घेण्यासाठी जाताच तो तेथून पळून जाण्याचा प्रयत्न करू लागल्याने त्याला पाठलाग करून ताब्यात घेण्यात आले.
या विधी संघर्षित बालकास ताब्यात घेवून गुन्ह्याच्या अनुषंगाने कसोशिने व विश्वासात घेवून तपास करत असताना, त्याने दाखल गुन्हा केल्याची कबुली देवून, दाखल गुन्हा हा त्याने त्याची पत्नी जेलमध्ये असून तीचा जामीन करण्यासाठी पैशांची आवश्यकता असल्याने मयताचे अंगावरील सोन्याचे दागिने चोरून पैसे मिळवण्यासाठी केल्याचे तपासात सांगितले. सदर विधी संघर्षित बालकाकडून दाखल गुन्ह्यात जबरीने चोरलेल्या मालापैकी काही सोन्याचे दागिने, मयताचा मोबाईल हँडसेट व गॅस सिलेंडर असा एकूण ३०,४०० रू. किं.चा माल दोन पंचांसमक्ष हस्तगत करण्यात आला असून गंभीर व क्लिष्ट स्वरूपाचा गुन्हा उत्कृष् रित्या तपास करून उघडकीस आणण्यात आला आहे. दाखल गुन्ह्यातील निष्पन्न विधी संघर्षित बालकाचे वय दिनांक ०९/०८/२०२३ रोजी १८ वर्षे पुर्ण होणार असून, त्याच्याविरूद्ध गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत.
ही कामगिरी विनयकुमार चौबे पोलीस आयुक्त, डॉ. संजय शिंदे पोलीस सह आयुक्त, वसंत परदेशी अपर पोलीस आयुक्त, विवेक पाटील पोलीस उप आयुक्त परिमंडळ- १, सतीश कसबे सहायक पोलीस आयुक्त, राम राजमाने वरिष्ठ पोलीस निरिक्षक व श्रीमती रूपाली बोबडे पोलीस निरीक्षक (गुन्हे) पिंपरी पोलीस ठाणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप निरीक्षक अनिरूध्द सावर्डे, शाकिर जिनेडी, पो.हवा. राजेंद्र बारशिंगे, शांताराम हांडे, अविनाश कदम, वसंत बेंदरकर, पो.ना. जावेद बागसिराज, गणेश करपे, सोमेश्वर महाडीक, विष्णू भारती, ओंकार बंड, जावेद मुजावर, मपोना भाग्यश्री जमदाडे, पो.शि. मोहसिन शेख, विजय जानराव, रोहित वाघमारे, विकास रेड्डी, समीर ढवळे, आनंद बजबळकर व दत्ताजी कवठेकर यांनी केली आहे.














