न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०८ ऑगस्ट २०२३) :- कंपनीमध्ये असताना फिर्यादीच्या मोबाईल नंबरवरील टेलीग्राम अँपवर महिलेने हायचा संदेश पाठवला. त्यानंतर महिलेने फिर्यादी यांना आंतरराष्ट्रीय हॉटेल व्यवसायात बुकिंग, रजि व सेल्स याकरिता पार्ट टाईम काम करण्याबाबत गुंतवणुक व त्यातून भरघोस परताव्याबाबत माहिती दिली. गुतंवणूकीच्या उद्देशाने फिर्यादीने आरोपीने वेळोवेळी पाठवलेल्या खात्यावर सुरवातीस पैसे पाठविले. आरोपीने कमीशनसह फिर्यादीला खात्यावर रक्कम पाठवुन फिर्यादीचा विश्वास संपादन केला. त्यानंतर फिर्यादीकडुन टेलीग्राम अँप वर ग्रॅण्ड पॅकेजचे आमिष दाखवुन वेगवेगळया खात्यावर पैसे घेतले. ते पैसे परत करण्याबाबत फिर्यादीने ऑनलाईन तक्रार केली. मात्र तक्रार मागे घेण्यासाठी जीएसटीकरिता पुन्हा पैसे प्राप्त केले. सदर रक्कम परत न करता फिर्यादी यांची ११,८४,१८१ रुपयांची आर्थिक फसवणुक केली, असे फिर्यादीत म्हटले आहे.
ही घटना (दि. २२/०७/२०२३ रोजी ५.०५ वाजता ते दि.३०/०७/२०२३ रोजी ३.४५ च्या दरम्यान फिर्यादीच्या मोबाईलवरुन घडली. महिला फिर्यादीने आरोपी MARRIOTT BONVOY व त्याचा मो नं ७७०१९४३७१८ व ६००९६०६४८४ (पुर्ण नाव पत्ता माहित नाहि) यांच्या विरोधात फिर्याद दिली आहे.
हिंजवडी पोलिसांनी ९३३/२०२३.भा.द.वि. कलम ४२०, ४०६ प्रमाणे आरोपींवर गुन्हा दाखल केला आहे. पोउपनि यलमार पुढील तपास करीत आहेत.














