न्यूज पीसीएमसी नेटवर्क
चिंचवड (दि. ३ एप्रिल) :- महावितरण वीज कंपनीच्या भोंगळ कारभाराचा फटका चिंचवड येथील महिलेला बसला आहे. हाय व्होल्टेजमुळे घरातील टीव्ही, सेटटॉप बॉक्स आणि वॉटर फिल्टर खराब झाले आहे. महावितरणच याला जबाबदार आहे. त्यामुळे महावितरणाने मला नुकसान भरपाई अशी मागणी पत्राद्वारे कविता अहिर यांनी महावितरणच्या वरिष्ठ अधिका-यांकडे केली आहे.
यात त्यांनी म्हटले आहे की, मंगळवार (दि. २ ) रोजी सायंकाळी सव्वासहाच्या सुमारास घरातील विजेच्या वायरीमध्ये हाय व्होल्टेज आल्यामुळे घरातील टीव्ही, सेटटॉप बॉक्स आणि वॉटर फिल्टर ही विद्युत उपकरणे नादुरुस्त झाली आहेत. १५ ते २० दिवसांपूर्वी देखील असाच हाय व्होल्टेजचा त्रास झाला होता.
त्यावेळी फ्रिज नादुरस्त झाला होता. तो स्व:खर्चाने दुरुस्त केला होता. त्यावेळी देखील तक्रार केली होती. परंतु, त्याची दखल घेतली नाही. यावेळी खराब झालेल्या विद्युत उपकरणाच्या दुरुस्तीचा खर्च महावितरणकडून केला जावा, असे या पत्रात अहिर यांनी म्हटले आहे.










