न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पुणे (दि. ३ एप्रिल) :- पंतप्रधान नरेंद्र मोदी महोदय, तुम्ही शेतकऱ्यांच्या समस्या, वाढत्या बेरोजगारीबद्दल का बोलत नाही? राफेलच्या किंमतीबाबत जनतेच्या शंकेचं निरसन का केलं नाही? पवार कुटुंबात काय चाललंय हे प्रचार सभेत सांगून जनतेच्या रोजीरोटीचा प्रश्न सुटणार आहे का? जनतेचं लक्ष विचलित करण्याचा हा डाव असल्याचे अजित पवार म्हणाले.
लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराला सर्व राजकीय पक्ष मैदानात उतरले आहेत. नरेंद्र मोदी यांनी प्रचार सभेला जोरदार सुरवात केली. तसेच नरेंद्र मोदी आपल्या भाषणातून काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसवर जोरदार टीका करत आहेत.
नरेंद्र मोदी वर्ध्याला प्रचारसभेत सहभागी झाले होते. त्यांच्याकडून अनेक नवीन घोषणांची अपेक्षा मी ठेवली होती. मात्र मोदींनी राष्ट्रवादी पक्षाचे चित्र जनतेसमोर मांडले, असेही पवार म्हणाले.


















