- भाड्याच्या घरात राहणाऱ्या नागरिकांवर आर्थिक भार…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १० ऑगस्ट २०२३) :- नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाने आता ऑनलाइन भाडेकरार (लिव्ह अँड लायसन्स) आणि सदनिकांचे प्रथम विक्री करारनामे (फर्स्ट सेल) यासाठी देखील दस्त हाताळणी शुल्क आकारण्याचा निर्णय घेतला आहे. या दोन्ही प्रकारच्या दस्तांसाठी अनुक्रमे ३०० आणि १ हजार रुपये शुल्क आकारण्यात येणार आहे. आतापर्यंत ऑनलाइन भाडेकरार आणि फर्स्ट सेल यांच्यासाठी दस्त हाताळणी शुल्क नव्हते. त्यामुळे भाड्याच्या घरात राहणाऱ्या नागरिकांना यानिमित्ताने भाडेकरारासोबत अतिरिक्त शुल्क भरावे लागणार आहे.
नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाकडून वर्षाला तब्बल ४० हजार कोटींचा महसूल जमा होतो. या विभागाने नागरिकांना अनेक सेवा ऑनलाइन उपलब्ध करून दिल्या आहेत. त्यामध्ये ऑनलाइन भाडेकरार आणि बांधकाम व्यावसायिकांकडून सदनिका खरेदी नागा करणाऱ्या नागरिकांसाठी विकसकाच्या कार्यालयातच दस्त नोंदणीची सुविधा सुवि उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे नागरिकांना दस्तनोंदणी कार्यालयांत जाण्याची गरज नाही.
या दोन्ही प्रकारच्या सुविधांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे दस्त हाताळणी शुल्क रक्कम कमी होत जाणार आहे. ऑनलाइन सविधांसाठी संगणक प्रणाली देखभाल अद्ययावतीकरण, सर्व्हर, साठवणूक, हार्डवेअर, कनेक्टिव्हिटी यांवरील खर्च, माहितीचा प्रचार प्रसार यांसाठी खर्च होत आहे त्यामळे ऑनलाइन दस्तांसाठीदेखील दस्त हाताळणी शुल्क आकारणे आवश्यक आहे, असे सांगत राज्य शासनाने हा निर्णय घेतला आहे.
“ आयसरितामधून नोंद होणाऱ्या दस्तांना दस्त हाताळणी शुल्क आकारण्यात येते. मात्र, ई-रजिस्ट्रेशन या सुविधेद्वारे येणाऱ्या दस्तांसाठी हे शुल्क आकारण्यात येत नव्हते. दस्त हाताळणी शुल्कातून मिळणाऱ्या महसुलातून ऑनलाइन सुविधांचा देखभाल व दुरुस्तीचा खर्च करण्यात येतो. लाखो ऑनलाइन दस्तनोंदी होतात, त्यामुळे अशा प्रकारच्या दस्तांना दस्त हाताळणी शुल्क आकारण्याची गरज होती.”
– अभिषेक देशमुख, नोंदणी उपमहानिरीक्षक (संगणक)














