- म्हाळुंगेतील मदरसन कंपनीतील घटना…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १० ऑगस्ट २०२३) :- मरेल्ली मदरसन अॅटोमोटिव्ह लाईटिंग इंडिया प्रा.लि. कंपनीतील उघडया स्टोअरमधुन ४९,३७,७२० रुपये किंमतीचे डीव्हीयु एच ६ एचएल कंट्रोल युनिट, एसएलएम १३६६०० सी २५७ हा पार्ट, १४३२ नग व एम ६ एमसीए प्रिमियम व्हर्जन कंट्रोल युनिट, १३४७०० सी २५७ हा पार्ट ७४३ नग कोणीतरी अज्ञात चोरट्याने कंपनीच्या संरक्षण भिंतीवरुन उडी मारुन कंपनीत येवून स्टोअर रुममध्ये उघडया शटरव्दारे प्रवेश करुन चोरुन नेले आहेत.
हा चोरीचा प्रकार (दि. १४ जुलै ते दि. ०१/०८/२०२३) दरम्यान मदरसन कंपनीत उघडया स्टोअर रुममध्ये महाळुंगे इंगळे ता. खेड जि. पुणे येथे घडला. फिर्यादी अविनाश तुकाराम हिंगे (डिव्हीजनल मॅनेजर) यांनी अज्ञात चोरटा इसम याच्या विरोधात महाळुंगे एमआयडीसी येथील पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी ४७४/२०२३ भा.द.वि.क. ३८० नुसार आरोपीवर गुन्हा दाखल केला आहे. पोउपनि शिंदे पुढील तपास करीत आहेत.