न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. 11 ऑगस्ट 2023) :- चिंचवडेनगर येथील जय गणेश कॉलनी परिसरातील मुख्य रस्त्यालगत राडारोडा आणि तोडलेल्या झाडाचे अवशेष टाकले आहेत.
शेजारीच महावितरणचा ट्रान्सफॉर्मर आहे. पावसाळा सुरू असल्यामुळे रस्त्यावर रहदारीला अडचण येत असून साचलेल्या घाणीतुन मच्छरांची पैदास होत आहे. अपघाताची शक्यता बळावली आहे.
त्यामुळे महापालिकेने तो राडारोडा त्वरीत उचलावा. तसेच झाड तोडणार्या आणि राडारोडा टाकणार्या व्यक्तीवर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.