न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ४) :- चिखली येथील नुर ए इमान सोशल तहेरीक (निस्ट) तर्फे थंड पाण्यासाठी फ्रीज बसवून लोकांसाठी पाणपोईची सोय सोनवणे वस्ती रोड, चिखली येथे करण्यात आली आहे.
या पाणपोई (फ्रीज) आणि पाणी टाकीचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी बोलताना नीस्टचे अध्यक्ष फिरोज शेख यांनी सांगितले की, उन्हामधे तहानलेल्या लोकांना थंड पाण्याची व्यवस्था करुन देऊन नीस्ट मानवतेचा संदेश देऊ इच्छित आहे.
यावेळी मौलाना अबरार अहेमद, गुलाबभाई तांबोळी, अमजदभाई शेख, हबीबभाई शिकलगार, नुरुद्दिन मौलवी इतर सदस्य हजर होते.










