न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ४) :- मावळ लोकसभा मतदारसंघातील युतीचे उमेदवार श्रीरंग बारणे आणि आघाडीचे उमेदवार पार्थ पवार यांनी उमेदवारी अर्ज दाखल करण्याकरीता नऊ एप्रिल तारीख ठरवली असल्याचे सूत्रांकडून समजले आहे.
या दिवशी विनायक चतुर्थी आहे. त्यामुळे या शुभमुहूर्तावर पार्थ पवार व खासदार बारणे उमेदवारी अर्ज भरणार आहेत. ०९ एप्रिल रोजी सकाळी अकरा वाजता पार्थ पवार उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. त्यापूर्वी खंडोबा माळ किंवा संभाजी चौक या दोन्हीपैकी एका ठिकाणाहून प्राधिकरण कार्यालयापर्यंत रॅली काढण्याचे नियोजन कऱण्यात आले आहे. पवार यांचा अर्ज दाखल करताना अजित पवार, सुप्रिया सुळे, हर्षवर्धन पाटील, जयंत पाटील, डॉ.अमोले कोल्हे आदी सहभागी होणार आहेत.
नऊ एप्रिल रोजी युतीचे उमेदवार श्रीरंग बारणे उमेदवारी अर्ज दाखल करणार असून, त्याआधी भाजपाचे शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप यांना उपस्थित राहण्यासाठी निमंत्रण देणार असल्याचे समजते.










